Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतिमिरातून - तेजाकडे ....शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट रायगड यांचा स्तुत्य उपक्रम !

तिमिरातून – तेजाकडे ….शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट रायगड यांचा स्तुत्य उपक्रम !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे ज्ञान..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही . कॉम्प्युटर युगात जगात भरारी घ्यावयाची असेल तर उच्च शिक्षणा बरोबरच जागतिक पात्रतेची माहिती , अनुभव , योग्य मांडणी , हजरजबाबीपणा , बोलण्याची पद्धत , अचूक उत्तर , सुसूत्रीपणा , स्टेज डेअरिंग , उत्तम पर्सनीटी या सर्वांची सांगड तुमच्या अंगी असावी लागते , तरच तुम्ही फिनिक्स पक्षांसारखी राखेतून गगनात झेप घेऊन आपले ध्येय साध्य करून यशस्वी होऊ शकता . म्हणूनच ” तिमिरातून – तेजाकडे ” हि वस्तुस्थिती समजण्यासाठी शिवराय प्रतिष्ठाण ट्रस्ट – रायगड यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मा. सत्यवान यशवंत रेडकर ( कनिष्ठ अनुवाद अधिकारी , मुंबई सीमाशुल्क , भारत सरकार संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक – तिमिरातून तेजाकडे ) यांचे शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गाचे श्रवण केले.अखंड भारताचे दैवत , हिंदवी स्वराज्य संस्थापक , कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या जयंती निमित्ताने शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट – रायगड महाराष्ट्र यांनी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सत्यवान रेडकर आणि कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता आथणे मॅडम आणि महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जगदीश मरगजे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या बी कॉम , एम कॉम , एम ए , एल एल बी , पीजीडी ,एचआरएम ,पीजीडीएलएल , आणि आय एल ,पीजीडीटी शिक्षित विद्यार्थी व सहभागी तरुणांना चांगल्या प्रकारे मागदर्शन केले.कर्जत तालुक्यातील युवकांनी एमपीएससी , यूपीएससी परीक्षा पास होऊन शासकीय अधिकारी झाले पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचे- तालुक्याचे ,कर्जत शहराचे नाव रोशन झाले पाहिजे अशी शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट रायगड यांचे उदिष्ट व संकल्पना आहे.

कर्जत तालुक्यातील या कार्यक्रमात शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट रायगडचे संस्थापक अध्यक्ष नितीन महादेव औटे , उपाध्यक्ष विकास भोसले , खजिनदार संजय धामणसे आदी उपस्थित होते तर १०० च्या वर शिक्षित तरुण व विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शविली.

- Advertisment -

You cannot copy content of this page