![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोकणातील चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र दहिवली बुद्रुक येथील ग्रामदेवता ” त्रिमुखी आई श्री वरदान – मानाई देवीची ‘ त्रैवार्षिक समायात्रा दि. २३ ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान होत आहे. दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ, मुंबईतर्फे आयोजित या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शैक्षणिक समाजिक आणि क्रिडा श्रेत्रात अग्रेसर असलेले दहिवली बुद्रुक हे गावं, गावात जाण्यासाठी सावर्डे बस स्थानक पासून ५ किलोमीटर तसेच सावर्डे रेल्वे स्थानका पासून ३ किलोमीटर इतके अंत्तर आहे. गावात जाण्यासाठी चिपळूण दहिवली एस टी सेवा तसेच दहिवली रिक्षा सेवा उपलब्ध आहे. खासगी वाहनाने थेट मंदिराजवळ जाता येते. मंदिर परिसराचे विलोभनीय दृश्य आपले लक्ष वेधून घेते. डोंगराच्या सानिध्यात असल्याने घनदाट झाडी थंडगार आंनदी वातावरण असे निसर्गाचे वरदान गावाला लाभले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर प्रसन्नता आणि मन: शांती लाभते.
संपूर्ण भारतात अंतत्य दुर्मिळ अशा त्रिमुखी वरदान देवीच्या आणि त्रिगुणातील मानाई देवीच्या मुख मंडळावरील रूप प्रसन्न व लोभसवाणे आहे. डोंगरात वसलेली शक्ती स्वरूप, विंद वासेनी अधिशक्ती पुढे वरदान म्हणून प्रचलित झाली आहे. त्रिमुखी वरदान देवी भक्तांना वर देते आणि मानाई देवी ते मान्य करून पूर्णतःवास नेते. भक्तांच्या नवसाला पावणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे जागृत देवस्थान असा भाविकांचा विश्वास आहे. यात्रेचे औचित्य साधून शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यसनमुक्ती मार्गदर्शन , नेत्राचिकित्सा , कारणचिकिस्था , मोफत चष्मे वाटप, आरोग्य तपासणी आणि शेती विषेयक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दहिवली बुद्रक ग्रामस्थ प्रगती मंडळ , मुंबई आणि स्थानिक ग्रामथांच्या नियोजना अंतर्गत ३ दिवस आयोजित करण्यात आले आहे.
अधिक मास असेल त्या वर्षी ही समायात्रा पौष पौर्णिमेच्या २ दिवस आधी सुरु होते आणि पौष पौर्णिमेला यात्रेची सांगता होते. या वर्षी २३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत ही यात्रा संपन्न होत आहे. आईन जातीच्या सरळ झाडाची साल काढलेल्या खोडाला “लाट” असे संबोधले जाते, ही लाट साधारण पणे ५० फूट लांबीची असते. गावातून नाचवत, ठिकठिकाणी पंचारतीचा स्वीकार करत सर्व ग्रामथांचा मदतीने, ” गुलालाचे उधळण ” करत ” ढोलताशा आणी सनईच्या गजरात ” पवित्र लाटेचे आगमन ग्रामदेवतेच्या मंदिरा समोरील प्रांगणात होते. मंदिरा समोर २५ फूट उंचीच्या सागवानाच्या कायमस्वरूपी उभ्या असलेल्या लाकडी खांबावर केवळ मनुष्य बळाने तोलून ही लाठ बगाडाच्या खोबनीत बसवली जाते.याला लाट चढवणे असे म्हणतात. लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी ढोल सणाईच्या गजरात प्रथम मानकरी आणि नंतर भक्तगणांना दोरखंडावर चढवून कायमस्वरूपी उभ्या असलेल्या खांबा भोवती गोलाकार फिरवले जाते.
समायात्रा ही दहिवली गावाची शतकानुशतके चालत असलेली एक दैदिप्यामान परंपरा आहे. तसेच गावाच्या एकात्मातेचे प्रतिक आहे. या ३ दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता डफावर थाफ मारून, देवीचे गुणगान गाऊन केली जाते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी महाप्रसादचे आयोजन केले जाते. हजारो भाविक महाप्रसादचा लाभ घेतात. विधियुक्त देवी उपासनेचे कार्यक्रम मानकरी, गुरव, आणि ग्रामस्थांच्या देखरेखीखाली केले जातात.
त्रिमुखी आई वरदान – मानाईची कृपादृष्टी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ देवीची मनोभावे सेवा आणि प्रार्थना करतात, देवीचे आशीर्वाद घेऊन, सुविचाराचे सदाचाराचे सोने वाटून समायात्रेची सांगता केली जाते. या पवित्र कामी अध्यक्ष – सुनील घाग , कार्याध्यक्ष – रामदास घाग , उपाध्यक्ष – पद्माकर घाग , रमेश घाग , प्रताप घाग , प्रवीण घाग , संदीप नवरंग , सचिन घाग , शरद घाग , मारुती पांचाळ , रवींद्र राऊत ,कमलेश घाग ,आदी ग्रामस्थांच्या मदतीने मेहनत घेतात.