Thursday, March 28, 2024
Homeपुणेमावळदारुंब्रे नेरे येथील महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार..

दारुंब्रे नेरे येथील महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार..

मावळ (प्रतिनिधी) : दारुंब्रे- नेरे रोडवरील दुकानदार महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावले. ही घटना मंगळवार दि.17 रोजी दुपारी 12:45 वा.च्या सुमारास घडली.
याप्रकरणी दुकानदार महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या किराणा दुकानात असताना एक अनोळखी 25 वर्षीय इसम मोटर सायकलवरून फिर्यादीच्या दुकानासमोर आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने त्याने दुकानात प्रवेश केला फिर्यादीकडून पिण्यासाठी पाणी घेतले. यावेळी फिर्यादी दुकानाच्या काऊंटरजवळ उभ्या असताना अचानक तो काऊंटर जवळ आला व त्याने फिर्यादीच्या गळयातील 45 हजार रूपये किंमतीचे दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page