भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) दिलेला शब्द पाळणे , हे कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा स्वभावच आहे . म्हणूनच तर या मतदार संघात करोडो रुपयांचा निधी आणून ” विकासाची गंगा ” सर्वत्र अवतरलेली दिसून येत असताना खालापूर तालुक्यात २२ गावांत पुनर्वसन झालेले कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी सेवा संघाला जुलै महिन्यात दिलेली वचनपूर्ती व ६० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी आपल्या अथक प्रयत्न करून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची बैठक लावून ” लय भारी ” काम करून तडीस नेले आहे . त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी सेवा संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष श्री. आनंदराव मरागजे ह्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. २७ जुलै २०२३ रोजी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी आझाद मैदान – मुंबई येथे साखळी उपोषण केले होते.सदर प्रसंगी सन्माननीय आमदार श्री.महेंद्रशेठ थोरवे यांनी मध्यस्थी करत नामदार मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबां बरोबर सभा लावण्याचे अभिवचन दिले होते. त्या अनुषंगाने आज दि. १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ठिक ४ – ०० वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल – मुंबई येथे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन तसेच पुनर्वसन मंत्री श्री अनिलजी पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी ह्यांच्या समवेत सकारात्मक बैठक संपन्न झाली.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी ६० वर्षात पहिल्यांदाच आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्यातून मुख्यमंत्री साहेबांबरोबरची बैठक लावली गेली.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पुढाकार घेत ” दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती ” केल्याबद्दल मुख्यमंत्री व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे सकल कोयना समाजबांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले . यावेळी कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते , यावेळी सकारात्मक चर्चा होवून त्यांना त्यांच्या मागणीनुसार न्याय देण्यात आला .तर ज्यांच्या जमिनी ओलिता खाली आलेल्या आहेत , त्यांची नावे सातबारावर लावण्यात येतील व जी जागा शिल्लक राहिली आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे पुन्हा सातबारावर नोंदी करण्यात येतील , असा महत्त्वपूर्ण निर्णय मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला असून भविष्यात हि कामे होण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करू , असे मत याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले.