Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळादेवघर येथे विध्यार्थी व पालकांसाठी लक्ष्य झेप कार्यशाळा संपन्न…

देवघर येथे विध्यार्थी व पालकांसाठी लक्ष्य झेप कार्यशाळा संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): स्व. वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय देवघर आणि आदर्श क्लासेस आयोजित लक्ष्य झेप या कार्यशाळेचे आयोजन देवघर येथील श्री. कालभैरव मंदिर येथे करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस विध्यार्थी व पालक यांनी मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.
“विध्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी स्वतः बदलण्याची गरज असते” प्रा. बालाजी विठोबा जाधव लक्ष्य झेप कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी बारा सत्रांच्या प्रशिक्षणाद्वारे विध्यार्थ्यांना संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी चे मार्गदर्शन, ज्यामुळे विध्यार्थ्यांमधील विशेष गुण ओळखण्यास मदत होईल, विध्यार्थ्यांना या माध्यमातून सुप्त शक्तींची जाणीव होण्यास व आपला ध्यास ओळखून लक्ष्यदर्शन होण्यास मदत होईल.
तसेच आवश्यक तत्वाची जोड देऊन कृतिप्रधान कौशल्ये विकसित करत त्यांच्यात सकारात्मक प्रवृत्तीची प्रेरणी करणे, यशासाठी लागणारी शिस्त (सवयी ) अंगी भिनवणे व मूलभूत नैतिक मूल्यांचे संस्कार देणे, जबाबदारीची जाणीव करून देणे याविषयावर त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यावेळी देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पाटील, शिक्षक प्रवीण हुलावळे, विजय कचरे, भगवंत क्षीरसागर, शिक्षिका मनीषा ठिकेकर, आदर्श क्लासेस चे सर्वे सर्वा हरीविजय देशमुख आदींनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तर यावेळी पालक वर्गामध्ये अमोल भेगडे, किसन येवले, गणेश आहेर, सुनील देसाई यांसह देवघर वाकसई करंडोली, जेवरेवाडी परिसरातील पालक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच सिमा आहेर आणि महिला पालकांनी आपापल्या पाल्याबद्दलच्या समस्या मांडून त्यावर मार्गदर्शन मिळविले. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण हुलावळे यांनी केले तर आभार बापू पाटील यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page