Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रदेशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात पुन्हा वाढ..सर्व सामान्यांना झटका !

देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात पुन्हा वाढ..सर्व सामान्यांना झटका !

अष्ट दिशा : देशातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्व सामान्य नागरिक हैराण झाला आहे.महागाई दिवसेंदिवस वाढताना भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत . दरम्यान याआधी 22 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती . त्यानंतर अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती.

आज या वाढत्या महागाईतून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ झाली असून,यामुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे . आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे . घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असणार आहे . आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.

आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे . किंमत वाढल्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page