Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळादेशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्सहात संपन्न...

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्सहात संपन्न…

लोणावळा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर आज सकाळी 8.25 वाजता मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी शाळांचे विध्यार्थी, पोलीस, विविध पक्षाचे कार्यकर्ते – पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच आजादी च्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा नगरपरिषदेने मागील चार दिवसांपासून नगरपरिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गिते , समूहगान स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , राजु बच्चे , प्रमोद गायकवाड , देविदास कडू , भरत हारपुडे , निखिल कविश्वर , सेजल परमार , संध्या खंडेलवाल , पुजा गायकवाड , मंदा सोनवणे , सुधिर शिर्के , सुर्वणा अकोलकर , ललित सिसोदिया , अमित गवळी , उद्योजक मुकेश परमार यांच्यासह शहरातील विविध मान्यवर , नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी , विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने रायवुड भागात वृक्षारोपण करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page