Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रदेशातील शेतकरी अक्रोशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राजीनामा द्यावा.-नितीन झिंजाडे'..

देशातील शेतकरी अक्रोशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राजीनामा द्यावा.-नितीन झिंजाडे’..

करमाळा, प्रतिनिधी, संतोष पवार

दि.08/12/2020 करमाळा-देशातील शेतकरी अक्रोशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.

याबाबत करमाळा तहसीलदार समीर माने यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,केंद्र सरकारने हल्लीच तीन कृषी विधेयकाचे अध्यादेश कोणत्याही चर्चेविना पारित केले आहेत.या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन दुष्परिणाम होणार असून शेतकऱ्याच्या कणा असणाऱ्या बाजार समित्या नष्ट होणार आहेत.

या कृषी विधेयकास पंजाबमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.त्या शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारने अमानुषपणे चिरडण्याचा घाट घातला आहे.शेतकरी हा अन्नदाता आहे त्याचा अवमान व अपमान केंद्र सरकारकडून होत आहे.अन्नदात्याच्या अवमानाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही.त्यांनी त्यांच्या सदविवेक बुद्धीस स्मरून पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश संघटक डॉ.अमोल दुरंदे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ऍड.अजिनाथ शिंदे,राष्ट्रवादी करमाळा विधानसभा अध्यक्ष सरपंच भोजराज सुरवसे,राष्ट्रवादी युवकचे आशपाक जमादार,राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे,जि.सदस्य अविनाश वाघमारे, शहराध्यक्ष ओंकार पलंगे,शहर उपाध्यक्ष आंनद कांबळे उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page