Friday, April 19, 2024
Homeपुणेदेहूरोडदेहूरोड काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने भारतीय संविधान दिवसानिमित्त अभिवादन सभा..

देहूरोड काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने भारतीय संविधान दिवसानिमित्त अभिवादन सभा..

देहूरोड दि.26: 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून मानला जात आहे. त्याचेच औचित्य साधून देहूरोड शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधाची अंमलबजावणी 26/11/1949 साली करण्यात आली होती. आज तोच दिवस भारतीय संविधान म्हणून मानला जात असून देहूरोड शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय देहूरोड व छावणी परिषद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच भारतीय इतिहासातील 26/11 हा काळा दिवस म्हणून ओळखला जात असून या दिवशी मुंबई येथील झालेल्या आतंकी भ्याड हल्ल्यात शहीद जवान व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख, सेवादल अध्यक्ष सुखदेव निकाळजे यांसमवेत कार्यकर्ते जलाल शेख, युवा नेते आकाश पिंजण, युवा नेते कुणाल पिंजण, युवा नेते योगेश टाकळकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page