Friday, March 29, 2024
Homeपुणेदेहूरोडदेहूरोड ते बेगडेवाडी स्टेशन दरम्यान आढळला 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह...

देहूरोड ते बेगडेवाडी स्टेशन दरम्यान आढळला 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

लोणावळा (प्रतिनिधी): देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान एका 40 वर्षीय पुरुषाचा अनोळखी मृतदेह आढळला असून कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दि.12/9/2022 रोजी देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी 164/24,26 जवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह रेल्वे लाईनजवळ मिळून आला. मायताचे वय अंदाजे 40 वर्षे, उजव्या हातावर जय मॉ शेरावली, डाव्या हातावर ॐ गोंडलेले आहे.

तर उंची 5 फूट 5 इंच इतकी असून, अंगाने सडपातळ, उभा चेहरा, नाक सरळ व चेहऱ्यावर दाढी – मिशी आहे. तसेच अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि चॉकलेटी रंगाची अंडरवेअर असा पेहनावा असून सदर मयत हा आपल्या परिसरातील, ओळखीचा अथवा नातेवाईक असल्यास लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन लोणावळा लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.याबाबत काही माहिती असल्यास प्रशांत संपत जाधव लोहमार्ग पोलीस, मोबाईल क्र.8888618100 यावर संपर्क साधावा.

- Advertisment -

You cannot copy content of this page