Saturday, April 20, 2024
Homeपुणेदेहूरोडदेहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान...

देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान…

देहूरोड दि. 22:अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार दिनांक 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण भारत देशामध्ये जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.

याचे औचित्य साधून केंद्र सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देहूरोड शहरात जनजागरण अभियान राबविण्यात आले.

देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या मुख्य नेतृत्वाखाली जनजागरण अभियान राबविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भंसाळी,पुणे जिल्हा ग्रामीण सहप्रभारी दादू भाई खान, पुणे जिल्हा ग्रामीण महिला प्रभारी उत्कर्षाताई रूपवते, पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार संजय जगताप , म. प्र. कॉंग्रेस कमिटी सचिव व प्रभारी सातारा जिल्हा श्रीरंग चव्हाण पाटील , पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ. सीमाताई सावंत, पुणे जिल्हा सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,खजिनदार महेश बापु ढमढेरे, प्रांतिक सदस्य गुजर साहेब, वरीष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ , सोपान म्हस्के,संजय उभे , कार्यालय सचिव चीवे साहेब इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दिपक सायसर यांनी केले तसेच देहूरोड शहर महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई राजेश जगताप यांच्याहस्ते उपस्थित महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. रानीताई पांडीयन,युवती महिला अध्यक्षा अनिता हाजिमलंग मारीमुत्तु, पुणे जिल्हा सदस्य मोहन राऊत, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी,जेष्ठ नेते काशिनाथ मारीमुतु,मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर भाई शेख, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव,किसान कॉंग्रेस देहूरोड अध्यक्ष संभाजी पिंजण,देहूरोड अल्पसंख्यांक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,सेवादल अध्यक्ष सुखदेव नीकाळजे, युवा नेते रोहन राऊत, अशोक कूसळे,माणिक वाघमारे, पोपट मोहिते,बबन टोम्पे, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष विल्सन पालीवाल, पर्यावरण अध्यक्ष आकाश रामणारायण, दक्षिण भारतीय अध्यक्ष व्यंकटेश रामणारायण,सांस्कृतिक सेल अध्यक्ष सुनिल कंदेरा,चंद्रशेखर मारीमुत्तु, शंकर मारीमुत्तु NSUI अध्यक्ष वर्धराजण मारीमुत्तु,अय्यपा मारीमुत्तु, रामू पवार तसेच महिला कार्यकर्त्या- गीता रामणारायण, तवमनी राजू अमावसी, अंजनी सेंगवानि, देवकी गुरुमूर्ती,उमा नारायण स्वामी तसेच सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page