Friday, March 29, 2024
Homeपुणेदेहूरोडधक्कादायक घटना देहूरोड मधील 3 अल्पवयीन मुली एकाच दिवशी बेपत्ता !

धक्कादायक घटना देहूरोड मधील 3 अल्पवयीन मुली एकाच दिवशी बेपत्ता !

देहूरोड : देहूरोडमधून एकाच दिवशी एकाच शाळेतील 3 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि .11 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर घडली . याबाबत अज्ञात आरोपीविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा नागरगोजे ( वय 15 ) , कसीश शिंदे , ( वय 15 ) , खुपशी शिंदे ( वय 13 ) अशा या तीन अल्पवयीन बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी वसंत दिनकर नागरगोजे ( वय 43 , रा . देहूगाव , ता . हवेली , जि . पुणे ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

देहूरोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी नागरगोजे यांची मुलगी स्नेहा नागरगोजे 11 जुलैला सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून शाळेला जाते सांगून गेली . त्यानंतर शाळेच्या शिक्षिका यांनी फिर्यादीच्या पत्नीला फोन करून कळवले की त्यांची मुलगी शाळेला आली नाही . तसेच कसीश शिंदे , खुशी शिंदे , ( रा . देहूगाव ) या दोघी पण शाळेत आल्या नाहीत . त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेतला पण त्या मिळाली नाहीत . फिर्यादी यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून त्यांना पळवून नेले आहे.

बेपत्ता मुलींचे वर्णन पुढील प्रमाणे आहे 1) नाव स्नेहा नागरगोजे – वर्ण काळा सावळा , निळ्या रंगाचे जॅकेट , चौकडा शर्ट व निळी सलवार घातलेली . नाक सरळ . नाकामध्ये उजव्या बाजूला चमकी . मराठी व हिंदी भाषा बोलते . सोबत शाळेची बॅग आहे .2) कसीश शिंदे – निळ्या रंगाचे जॅकेट , चौकडा शर्ट व निळा सलवार घातलेला . नाक मोठे . मराठी व हिंदी भाषा बोलते . सोबत शाळेची बॅग आहे . 3) खुशी शिंदे – निळ्या रंगाचे जॅकेट , चौकडा शर्ट व निळा सलवार घातलेला . नाक मोठे . मराठी व हिंदी भाषा बोलते . सोबत शाळेची बॅग आहे.

वरील वर्णनावरून बेपत्ता असलेल्या मुली कोणाला आढळल्यास तात्काळ देहूरोड पोलीस ठाण्यात कळवावे , असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी . आर . अतिग्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page