Friday, April 19, 2024
Homeपुणेवडगावधनगर समाजाच्या मागण्यासाठी दिले मावळ तहासिलदाराना निवेदन,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा उपक्रम..

धनगर समाजाच्या मागण्यासाठी दिले मावळ तहासिलदाराना निवेदन,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा उपक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना महाराष्ट्रात कार्य करीत असून आज त्यांच्या वतीने काल मावळ चे तहसीलदार यांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले, हे निवेदन ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.


धनगर समाजावर आजही अन्याय होत असून दिवसेंदिवस मेंढपालावर हल्ले वाढत आहेत, धनगर समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत, याची सरकारला आठवण करून देण्यासाठी या संघटनेच्या वतीने मावळ चे तहसीलदार सुदाम बर्गे यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात धनगर समाजाची एसटी आरक्षनाची अमलबजावणी तात्काळ करा, धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊनच मेगा भरती करावी, धनगर समाज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या स्वयंयोजनेबाबत सरकार गप्प का? त्यांची त्वरित अमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणी त्वरित आदेश द्यावेत, दूध उत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळावा, अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करावा, धनगर समाजातील मेंढपालाना चरण्यासाठी वने आरक्षित करून त्यांना पास उपलब्ध करून घ्यावा, या मागण्यांसाठीचे निवेदन आज देण्यात आले तर या आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवाव्या अशी मागणीही यावेळी केली.


यावेळीं ऑल इंडिया महासंघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय सरक, पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम कोकरे, ऑल इंडिया मावळ तालुका धनगर समाज अध्यक्ष बाबुराव शेडगे, उपाध्यक्ष भाऊ आखाडे, कार्याध्यक्ष बारकू खरात, सोशिअल मीडिया प्रमुख संतोष खरात, संपर्क प्रमुख वाघू कोकरे, राष्ट्रीय समाज पक्ष मावळ तालुका अध्यक्ष रामजी कोळेकर, वेल्हा तालुका उपाध्यक्ष नथुराम डोईफोडे, सरपंच दत्ता आखाडे, पप्पू शेडगे, नामदेव शेडगे, गणेश शेडगे, प्रकाश शेडगे, लक्ष्मण आखाडे, लहू ठिकडे, भीमा शिंगाडे, लहू आखाडे, बापू शेडगे, सुर्यग्रुप मावळ तालुका अध्यक्ष अनंता मरगले, अमोल ठोंबरे, महेश ठोंबरे, भीमा करे, आदी सह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page