Friday, March 29, 2024
Homeमनोरंजननवरात्रोत्सवात आलाय - सत्वाची माझी गावदेवी..

नवरात्रोत्सवात आलाय – सत्वाची माझी गावदेवी..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

परंपरेने व भक्तिभावाने समृद्ध अशी आगरी कोळी संस्कृती , या संस्कृतीची आराध्य देवता श्री एकवीरा देवी व केळवणे गावची गावदेवी भवानी माता कोळी गीत आताच प्रदर्शित झाले आहे. सौरभ ठाकूर निर्मित या गाण्याचे नाव ” सत्वाची माझी गावदेवी” असे आहे . सुंदर नृत्य , मधुर आवाज, अभिनय आणि महत्वाचे म्हणजे सर्व कलाकार हे नवीन असून त्यांनी हे गाणं लोकांसमोर आणले.रोशन पाटील यांचे शब्द या गीतात असून गायक शैलेश कोंडीलकर व गुलशन कोंडीलकर यांनी हे गाणं तयार केलं आहे.
नृत्यकार कांता डि गावंड , प्रवीण ठाकूर , सुमित पाटील व दिक्षिता बैकर या कलाकारांनी आपले अभिनय व नृत्य अदाकारी या गाण्यात दाखवली आहे.नवरात्रीच्या मंगलदायी वातावरणात श्री गावदेवी आईचे हे कोळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे कोळीगीत प्रेक्षकांच मन हर्षुन जाईल अशी गाण्यातील कलाकारांची व सहकाऱ्यांची खात्री आहे. “सौरभ ठाकूर” या युट्युब चॅनेल वर ” सत्वाची माझी गावदेवी” हे गाणं आपण पाहू शकता
- Advertisment -

You cannot copy content of this page