Friday, March 29, 2024
Homeपुणेनवले पुलावरील अपघाताचे गूढ आले समोर, ब्रेक फेल नाही तर कंटेनर न्यूट्रल...

नवले पुलावरील अपघाताचे गूढ आले समोर, ब्रेक फेल नाही तर कंटेनर न्यूट्रल असल्यामुळे घडला भीषण अपघात…

पुणेः काल रात्री पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क 24 वाहनांना चिरडले . या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे . ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होते. परंतु याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ अपघात झाला . रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल 24 वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले . या भीषण अपघातात 13 जन गंभीर जखमी झाले . त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अपघातात कार , रिक्षा , दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला . या घटनेमुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
आज खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली . कंटनेनरचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो फरार आहे . यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे . त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
हा अपघात ब्रेक फेल झाल्याने घडल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आता याबाबत स्पष्टता झालेली असून उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे . उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली . त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही . ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे 13 जण जखमी झालेत तर 24 वाहनांचे नुकसान झाले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page