Friday, April 19, 2024
Homeपुणेदेहूरोडनागरिकांच्या सतर्कतेमुळे घोणस जातीच्या सर्पाचे सर्प मित्रांनी वाचविले प्राण...

नागरिकांच्या सतर्कतेमुळे घोणस जातीच्या सर्पाचे सर्प मित्रांनी वाचविले प्राण…

देहूरोड(प्रतिनिधी) :आळंदी येथील माऊली पार्क मध्ये चार फुटाची घोणस प्रसाद जगताप यांना त्यांच्या घरासमोरील गेटजवळ आढळून आली.

याची वार्ता रोहित फड यांना कळाली . त्यानंतर तत्काळ तिथे जाऊन रोहित फड यांनी ती घोणस आपल्या कौशल्या द्वारे पकडून तिला प्लास्टिकच्या मोठया बरणीत ठेवण्यात यश मिळवले.त्यानंतर सर्प मित्रांना बोलवून ती त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

सर्प मित्रां कडून त्यावेळी सांगण्यात आले की , ही विषारी घोणस आहे. सर्प मित्रांनी तीला वनविभागात सोडून दिले.माऊली पार्क मध्ये राहत असलेल्या रोहित फड यांनी त्याच भागातील चार साप याआधी पकडून वडगांव घाटातील वनविभागात सोडून दिले आहेत . प्रसाद जगताप बाहेरून घरी येत असताना ही बाब समोर आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

- Advertisment -

You cannot copy content of this page