Friday, March 29, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडनिगडी चौकात खासगी बस ने दोन वाहनांना चिरडले ,दोन जन जखमी !

निगडी चौकात खासगी बस ने दोन वाहनांना चिरडले ,दोन जन जखमी !

निगडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बसने दोन वाहनांना चिरडले असल्याची घटना शनिवारी दुपारी टिळक चौक, निगडी येथे घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

यामध्ये अतुल भीमराव नवघरे ( वय 40 , रा . चिंचवड ) , किशोर रामदास भांगर ( वय 30 , रा . काळेवाडी ) हे दोघे जखमी झाले आहेत .

दुर्गा चौक ते टिळक चौक या रोडवर टिळक चौकातील सिग्नलजवळ बस क्र.( MH 14 BA 8433 ) उभी होती . तिच्या मागे रिक्षा ( MH 14 GE 5068 ) , त्यामागे मोपेड दुचाकी ( MH 14 DQ 9743 ) आणि त्याच्या मागे खाजगी कंपनीची बस ( MH 14 DW 4680 ) उभी होती.

कंपनीच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुढील दोन वाहनांवर येऊन आदळली . यात दोघेजण जखमी होऊन रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले.अपघातानंतर बसचा चालक पळून गेला . दरम्यान , काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली . सर्व वाहने पोलीस ठाण्यात नेली आहेत.अपघात करणाऱ्या बसचे इंजीन लॉक झाल्याने क्रेनच्या सहाय्याने बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली . याप्रकरणी रात्री उशीरा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page