Saturday, April 20, 2024
Homeपुणेमावळनिलसागर असोसिएशनच्या अनियमित कारभाराची सहकार विभागामार्फत चौकशी व्हावी..

निलसागर असोसिएशनच्या अनियमित कारभाराची सहकार विभागामार्फत चौकशी व्हावी..

कार्ला :निलसागर रेसिडेन्सी कंडोमिनियम ओनर्स असोसिएशनच्या अनियमित कारभाराची सहकार विभागामार्फत चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी डॉ.शेखर सेन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

नुकतीच निलसागर रेसिडेन्सी मळवली येथे डॉ.शेखर सेन यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती निलसागर हौसिंग सोसायटीत मनमानी कारभार सुरू आहे. निलसागर रेसिडेन्सी कंडोमिनियम ओनर्स असोसिएशनच्या कारभाराची चौकशी सहकार विभागातर्फे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .यांच्या सोबत रिजू बजाज व इतर सहकारी यांनी पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या कारभारावर शंका उपस्थित केल्या.

असोसिएशनच्या सभासदांना विचारात न घेता कारभार केला जात आहे, सोसायटीचे अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कार्ला येथे आहे सदर अकाउंट अध्यक्ष सचिव खजिनदार यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हाताळावे असे असताना बँक खाते अध्यक्ष व सचिव हेच हाताळतात कोणत्या व्यवहारात खजिनदारांना विश्वासात घेतले जात नाही तसेच अनाठायी खर्च केला जात आहे .

संस्थेच्या घटने नुसार कारभार होत नाही संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत नाहीत असे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत. 2016 पासून खरेदी केलेल्या जागेचे सातबारा देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहे.

सोसायटी तर्फे दरमहा देखभाल खर्चासाठी ठराविक रक्कम आकरली जाते. परंतु सोसायटी तर्फे रहिवासीना सुविधा पुरविल्या जात नाहीत, एका बंगल्यासाठी फक्त 100 लिटर पाणी पुरविले जाते.त्यामुळे रहिवासी वैतागले आहेत. सदर सोसायटीत मुबंईतील
उच्चभ्रू लोक राहतात.

सोसायटी मध्ये स्विमिंग पूल आहे कितीतरी दिवसापासून बंद आहे. सोसायटीच्या खर्चात स्विमिंग पूल दुरुस्ती साठी खर्च केल्याची नोंद आहे.संबंधित अधिकारी यांची तक्रार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

तक्रारदारां द्वारे मागणी आहे की सहकार विभागामार्फत चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करून सर्वानुमते नवीन संचालक मंडळ निर्माण करावे.

- Advertisment -

You cannot copy content of this page