Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे यशस्वी प्रयत्न...

पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे यशस्वी प्रयत्न…

खालापूर ( दत्तात्रय शेडगे)
यंदाच्या पर्यटन मोसमात वीक एन्ड आणि हॉलीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात खालापूर तालुक्यात दाखल होत असताना नदी, तलाव, धबधबे त्याच प्रमाणे धरणात बुडून होणाऱ्या पर्यटकांच्या मृत्यूला आळा घालण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटकांसाठी जिल्हा बंदीचे निर्देश दिले होते.

पर्यटनावर बंदी आणि अतिवृष्टीने हाहाकार उडालेला असूनहा पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथून बेधुंद पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे निर्बंध जुगारत पर्यटनाचा असुरी आनंद घेताना दिसले, परिणामांती अनेक पर्यटकांना जीवाशी मुकावे लागले.पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनेने व्यथित झालेल्या खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी असे दुदैवी अपघात घडूच नयेत म्हणून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीसोबत याबाबतीत उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करून तातडीने उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या परवानगीने अपघात प्रवण क्षेत्रांत पोलीस कर्मचारी नेमन्याचा, दंडात्मक कारवाई करण्याचा आणि संबंधित विभागातील पोलीस पाटील यांना सतर्क ठेवण्याचा निर्णय घेतला.

या उपाय योजनांच्या अनुषंगाने खालापूर पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात येणाऱ्या चौक आणि वावोशी पर्यंतच्या हद्दीत पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव केला गेला. पोलीस यंत्रणेकडून अवलंबलेल्या कार्यवाहीमुळे साधारणपणे मागील दोन आठवड्याचे वीक एन्ड आणि महत्वाच्या सुट्ट्यांच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पर्यटकांच्या उत्साहाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपायांमुळे मृत्यूला रोखण्यात यश आल्याचे समाधान पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त करत अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न कारणात आहोत असे प्रतिपादन केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page