Thursday, April 25, 2024
Homeपुणेमावळपर्यटन बंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक पाण्यात बुडाला तळेगाव येथील घटना..

पर्यटन बंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक पाण्यात बुडाला तळेगाव येथील घटना..

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुणे जिल्ह्यात सर्वच पर्यटन स्थळावर बंदी असल्याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर लोणावळा खंडाळा,मावळ तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांना पर्यटनासाठी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे अशातच पर्यटन स्थळावर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून पर्यटकांना पुन्हा मागे पाठविण्यात आहे तर अनेक पर्यटकांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे परंतु छुप्या रस्त्याने अनेक पर्यटक पर्यटन स्थळावर पोहोचत आहेत.

मावळ तालुक्यातील तळेगाव येथे असणार्‍या कुंडमळा या ठीकानी इंद्रायणी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पिंपरी गांधी नगर येथून तीन पर्यटक काल दुपारच्या सुमारास तळेगाव येथे आले होते वाहत्या पाण्यामध्ये चप्पल धुण्यासाठी गेलेला ३० वर्षीय युवक तोल जाऊन पाण्यात पडल्याने वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तबरेज पटेल असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळावर दाखलं होत पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला परंतु वाहत्या पाण्यामध्ये बुडालेला तरुण त्यांना आढळून आलेला नाही पोलिसांकडून एनडीआरएफ च्या तुकड़ीला या घटनेबाबत माहिती देण्यात आली परंतु कालं अंधार झाल्याने आज सकाळपासून शोध मोहीम सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ,घटनेचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page