Saturday, April 20, 2024
Homeक्राईमपवना नगर येथील चोरीस गेलेल्या बुलेरो जिप व आरोपीस पाठलाग...

पवना नगर येथील चोरीस गेलेल्या बुलेरो जिप व आरोपीस पाठलाग करून एल सीबी पथकाने केले जेरबंद….

लोणावळा :पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवनानगर ता.मावळ येथून दि. 27 ऑक्टोबर रोजी चोरीस गेलेल्या बोलेरो जीपचा पाठलाग करून जीपसह आरोपीस पाटस ता.दौंड येथे जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी पवनानगर ता.मावळ येथून दुपारी ०१.३० वा.चे सुमारास महिंद्रा बोलेरो जीप नं. एमएच १४ सीसी ७९४७ ही चोरीस गेली होती.
बोलेरो जीप मालक मंगेश रामचंद्र कालेकर यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतल्यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. जीप मालक मंगेश कालेकर यांना त्यांचा कामगार चालक विजय सोनकांबळे हा सुद्धा गायब असल्याने त्यानेच जीप चोरी करून फरार झाल्याचा संशय असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीसांनी तात्काळ चोरी झालेल्या जीपचा नंबर व वर्णनासह माहिती नियंत्रण कक्षा मार्फत वायरलेस व पोलीस व्हॉटसअप ग्रुपवर व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणला दिली असता माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बोलेरो जीप चोरी बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल करून जीपची माहिती घेण्याबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना सदर बोलेरो जीप ही पुणे बाजूकडे गेलेली असून ती पुणे-सोलापूर रोडने आरोपी त्याच्या गावी नांदेड येथे घेवून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती.
त्याच अनुषंगाने जिल्हयातील व विशेषतः सोलापूर रोडला पेट्रोलिंग करणारे गुन्हे शाखेच्या पथकास एमएच १४ सीसी ७९४७ ही बोलेरो जीप पुणे-सोलापूर यवत येथे सोलापूर बाजूकडे जाताना दिसल्याने तिच्या चालकास थांबण्याचा इशारा केला परंतु चालकाने गाडी न थांबवल्याने तिचा सिनेस्टाइल पाठलाग करून पाटस ता.दौंड येथे जीपसह चालक विजय रमेश सोनकांबळे (वय २० वर्षे रा.पवनानगर, ता.मावळ जि.पुणे मूळ रा.जयभिमनगर, गल्ली नं.३, नांदेड जि.नांदेड ) ह्या आरोपीस ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेला आरोपी व गुन्हयात चोरलेली बोलेरो जीप पुढील कारवाईसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली असून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 1086/2020, भा.द. वी. कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास पो.ना. शेळके करत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करून पोहवा. सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, गुरु जाधव यांनी केलेली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page