Thursday, March 28, 2024
Homeपुणेमावळपवना नगर येथील भडवली जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण जनजागृती अभियान....

पवना नगर येथील भडवली जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण जनजागृती अभियान….

पवना नगर ( प्रतिनिधी ): पवन मावळातील भडवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्था , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक जलदिन सप्ताह निमित्ताने पर्यावरण जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रगीत आणि जल प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूजा लोहर , उपाध्यक्ष तानाजी घारे , अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते . आपल्या संपूर्ण जगावर ( ग्लोबल वार्मिंग ) जागतिक तापमान वाढीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे . त्या अनुषंगाने आपण देखील जास्तीत जास्त वृक्षारोपण व कमीत कमी प्रदूषण कसे होईल यासाठी पीपीटी व्हिडिओद्वारे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला . पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणामुळे पर्यावरणाला होणारी हानी व आपली जबाबदारी या विषयाची जाणीव करून देण्यात आली.

या उपक्रमाद्वारे शाळा व संस्था एकत्रित रित्या सीड बँक स्थापन करावी , असा संस्थेचा मानस आहे . या संकल्पनेद्वारे नवीन व स्थानिक रोपे तयार करण्यास मदत होईल.या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे वृक्षरोपणाची गती वाढेल व पुढील काळात कमी खर्चामध्ये स्थानिक भागामध्ये वृक्षारोपण करता येईल , असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर गराडे यांनी व्यक्त केले . यावेळी संस्थेचे खजिनदार अंकुश भोकसे यांनी या पुढील उपक्रमाची दिशादर्शक माहिती दिली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी केले . तर शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ आडकर यांनी उपस्थितांचे आभार मानून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page