Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळापावसाळ्याच्या सुरुवातीलाच लो. न. पा माध्यमिक शाळेत चिखलाचे साम्राज्य !

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लो. न. पा माध्यमिक शाळेत चिखलाचे साम्राज्य !

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालय लोणावळा शाळेची मान्सूनपूर्व दैनीय अवस्था झाली आहे. या इमारतीच्या आवारात चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून या शाळेतील विध्यार्थ्यांना शाळेत हजेरी लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाचे प्रमाण वाढताच याठिकाणी सर्वत्र पाणी साचून तलाव तयार होणार असल्याची स्थिती दिसून येत आहे.या इमारतीमध्ये मराठी, उर्दू शिक्षणासह मतिमंद मुलांसाठी संवाद शाळा देखील भरत असून अशा परिस्थितीत याठिकाणी विध्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे.

या विध्यार्थ्यांसाठी नगरपरिषद प्रशासन काहीच करू शकत नाही का? जास्त काही नाही तरी या ठिकाणी मुलांना शाळेत येण्यासाठी तात्पुरता रॅबिट टाकून रस्ता तयार करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी नाही का? असा प्रश्न पालकांना व विध्यार्थ्यांना पडला आहे.याबाबत शिक्षकांना विचारणा केली असता ते काहीही सांगत नाहीत.

मग अशा वेळी हे पालक जाणार कोणाकडे, आता लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेबांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास गरीब विध्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल असे मत पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तात्पुरता रॅबिटचा रस्ता येण्या जाण्यासाठी तयार करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page