Tuesday, April 16, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडपिंपरी येथील बेपत्ता 7 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त...

पिंपरी येथील बेपत्ता 7 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त…

पिंपरी(प्रतिनिधी) : खेळायला जातो असे सांगून घरा बाहेर पडलेल्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची दुर्दैवी घटना पिंपरी मध्ये मासुळकर कॉलनी येथे शुक्रवार दि .10 रोजी घडली.

आदित्य गजानन ओगले ( वय 07, रा. मासूळकर कॉलनी, पिंपरी ) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.तर मुलाच्या वडिलांकडे 20 कोटी रुपयांची मागणी केल्याची महितीही समोर आली आहे . त्यामुळे हा प्रकार पैश्यांसाठी झाला की आणखी कश्यासाठी झाला आहे याचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत .

याबाबत आदित्यचे वडील गजानन श्रीकांत ओगले ( वय 49 , रा . मासुळकर कॉलनी , पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यवसायिक आहेत . खेळायला जातो असे सांगून आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता . त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला . मात्र शोध लागला नाही . गजानन ओगले यांना एक फोन आला आणि त्याने 20 कोटी रुपयांची मागणी केली.

त्यानंतर आदित्यचे आई वडील यांनी पोलिसांकडे धाव घेताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला . सर्व ठिकाणी , वेगवेगळ्या पथकाच्या सहाय्याने तपास सुरु असताना पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी केली . त्यावेळी आदित्य याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले . आदित्य याचा मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर मिळून आला आहे. हा घातपात नक्की पैशांसाठी की आणखी काही याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

- Advertisment -

You cannot copy content of this page