Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळापुणे लोणावळा पुणे लोकलच्या आठच फेऱ्या असणार आहेत..रेल्वे जनसंपर्क अधिकारी !

पुणे लोणावळा पुणे लोकलच्या आठच फेऱ्या असणार आहेत..रेल्वे जनसंपर्क अधिकारी !

पुणे : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या तीन फेऱ्या वाढविल्या नाहीत पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांची माहिती.

पुणे लोणावळा पुणे या मार्गावरच्या लोकल गाड्यांच्या तीन फेऱ्या वाढविण्याची मान्यता रेल्वे विभागाने दिली असल्याचे पत्रक खोटे असून असे पत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेले नसून, मध्य रेल्वेचे खोटे पत्रक समाज माध्यमातून व्हायरल झाले आहे . यातून खोटी माहिती पसरविली गेली आहे . प्रवाशांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केले आहे , असे पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले .

तसेच कोरोनामुळे सर्वच मार्गावरील रेल्वे सेवा थांबविली होती . कोरोनाचा संसर्ग कमी होताच टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येत आहे. त्याप्रमाणे रेल्वे विभागाकडून अधिकृत जाहीर केले जाते परंतु सध्या याबाबत कोणतीही माहिती रेल्वेने जाहीर केलेली नाही व रेल्वे विभागाने सेवेतील रेल्वेच्या गाड्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही . तशी अधिकृत सूचना , वेळापत्रक , माहिती प्रसिध्दी विभागाकडे आलेली नाही . त्यामुळे कोणी यावर विश्वास ठेऊ नये . हे पत्रक समाज माध्यमावर कसे आले , याची माहिती नाही . पण सध्या पुणे- लोणावळा या रेल्वे गाडीच्या जाताना आणि येतानाच्या आठच फेऱ्या आहेत असे झंवर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page