Thursday, March 28, 2024
Homeपुणेपुण्यामध्ये रिक्षा प्रवास महागला, प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती..

पुण्यामध्ये रिक्षा प्रवास महागला, प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती..

पिंपरी(प्रतिनिधी) : रिक्षाचालकांनी केलेल्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने पुण्यातील रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयानुसार आता एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.

या भाडेवाढीमुळे किमान भाडे 25 रुपये असणार आहे . त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी भाडं वाढणार आहे . त्यानुसार रिक्षात बसल्यानंतर जेव्हा मीटर सुरु होते तेव्हा आता 21 रुपयांनी सुरु होते . ते आता एक सप्टेंबरपासून 25 रुपयांनी सुरु होणार आहे.तसेच एक किमीसाठी पुणेकर सध्या 14 रुपये मोजतात ते आता 17 रुपये मोजावे लागणार आहेत.


संपुर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे . त्यामुळे पुणे , पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page