Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळापेन्शनर डे निमित्त लोणावळा ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन ची वार्षिक सर्व...

पेन्शनर डे निमित्त लोणावळा ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन ची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा यांच्या वतीने पेन्शनर दिनानिमित्त वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन रविवार दि.18 डिसेंबर रोजी रेल्वे इन्स्टिटयूट लोणावळा येथे करण्यात आले.
यावेळी सिकंदराबाद मुख्यालय AIRRF अध्यक्ष एस. श्रीधरन, जॉईंट सेक्रेटरी एस. स्वामी, कल्याण झोन सेंट्रल उपाध्यक्ष अरविंद माने, पुणे शाखेचे अध्यक्ष सुनील कमठान व देहूरोड शाखेचे अध्यक्ष पन्नालाल आदी रेल्वेचे वरिष्ठ कार्मिंक अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन लोणावळा शाखा अध्यक्ष सुभाष गायकवाड, कार्याध्यक्ष बी. बी. गोसावी, सेक्रेटरी सचिदानंद बलराज, खजिनदार सुनील गोसावी, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष कोंडीबा रोकडे, सहसेक्रेटरी संजय गुरव,सहसेक्रेटरी पी. पी. बारी व सदस्य विलास कांबळे, सुलतान शेख, दत्ता केदारी, विकास मातेरे, रुपचंद शिदोरे, अनिल वाघमारे, शांताराम गोसावी, जयसिंग कांबळे, मिलिंद भोसले आदी पदाधिकारी व सदस्यांनी केले तर लोणावळा शहराचे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, माजी नगरसेविका आरोही तळेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, हमाल पंचायत लोणावळा अध्यक्ष राजाराम साबळे आदी मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांना शाल पुष्प गुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा यांच्या वार्षिक सभेच्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वे मध्ये रिटायर्ड असलेल्या 75 वर्षीय जेष्ठ कर्मचाऱ्यांरी नारायण लोभी, पांडुरंग कडू, नाना भाऊ वाघुले, शांताराम गोसावी, रामचंद्र वंजारे, श्रावण गायकवाड, भिका भालेराव, चिमा भीमा बोरकर, वसंत कांबळे, सुदाम कारके, सायबन्नाशी शिंगे, ए पी कोटूरकर, पांडुरंग कावडे, कुलभूषण सूद, महादेव ठाकर, बेन्नीस वल्लाधारीस आदी जेष्ठाचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी मान्यवरांचा परिचय देत सूत्रसंचालन केले. यावेळी सर्व उपस्थितांकडून आयोजकांचे कौतुकरुपी मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच. आपले मनोगत व्यक्त करताना श्रीधरन यांनी रिटायर्ड रेल्वेमेन्स यांच्या समस्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले, तसेच सर्व रिटायर्ड रेल्वे कर्मचारी आणि ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनी उमीद कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. रेल्वे दवाखान्यात डॉक्टर, नर्स व औषधांचा प्रादुर्भाव असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी ही मी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी आपापले मनोगत व्यक्त करत पेन्शनर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी बी बी गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page