Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडप्रशासनाचे नियम पाळा व कोरोनाला हरवा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे खोपोलीकराना आवाहन.

प्रशासनाचे नियम पाळा व कोरोनाला हरवा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे खोपोलीकराना आवाहन.

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खोपोली नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी चार दिवसापूर्वी पदभार स्विकारत माक्स न लावणारे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्यां विरोधात धडक करावाईला सुरूवात करीत व्यापारी व नागरिकांवर कारवाई बडगा उचलत दंडात्मक कारवाई जिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाने करीत यासाठी  तीन पथक निर्माण करून भाजी मार्केट,मटन मच्छी मार्केट तसेच बाजारपेठेत सकाळी ६.३० पासून फिरून धडक कारवाई करीत असल्याने व्यापाऱ्यांंसह खोपोलीकरांनी चांगला धसका घेतला आहे.


कोरोनाची काळजी घ्या प्रशासनाचे नियम पाळा नाहीतर कोरोना लढाईत आपण हरण्याची वेळ येवू नये देवू नका आपल्यासाठी तसेच कुटूंबासाठी तरी सतर्क राहा असे भावनिक अवाहन करीत काही जणांवर नाईलास्तव कारवाई करणे भाग पडत असल्याचे मत व्यक्त केले आहे.तर भणगे यांच्या बद्दल शहरात सहानुुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आठ दिवसांपासून कोरोनाग्रस्त असून त्यांच्यावर नवी मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांच्या जागेवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाने भणगे यांनी कोरणाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या चार दिवसापासून माक्स वापरणाऱ्यांंची संख्या ९९ टक्यावर आली आहे.यामध्ये मच्छी मार्केट,भाजी मंडई,बाजारपेठ,शास्त्री नगर,शिळफाटा,ताकई परिसर अक्षरशः पथकाला सोबत घेत माक्स लावा,सामाजिक अंतर पाळा यासंबंधी जनजागृती करीत आहेत.तर यादरम्यान वारंवार सांगूनही माक्स न वापरणाऱ्यांवर दुकाणंदार व नागरिकांनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page