(अष्ट दिशा मावळ प्रतिनिधी- संदीप मोरे )
दि. 28/7/2020 रोजी रात्री 12 ते 3 वा. च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने वाकसई गावच्या हद्दीतील ” कॅमेलिया ” सोसायटीमधील बं. नं. 9- A ह्या बंगल्याची स्लायडिंग खिडकी उचकटून आतील बॅगेतील 12, 000 रुपये रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार प्रेमजी हिमजी गड्डा ( वय 50)
यांनी दि. 29 रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला केली. पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तपास पो. ना. जितेंद्र दिक्षित ( 1918) लोणावळा ग्रामीण यांच्याकडे देण्यात आला.
पुढील तपास करताना सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार वसील सल्लाउद्दीन चौधरी ( वय 24, रा. वाकसई, ता. मावळ, जी. पुणे ) यानी केला असावा असा अंदाज व्यक्त करत असताना पो. ना. रफिक शेख ( 404) लो. ग्रा. पो. स्टेशन यांना सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पो. नी. संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे गुन्हे शोध पथकाच्या टिमने सापळा रचून आरोपीस राहत्या घरातून दि. 30 रोजी अटक केली त्याच्याकडे चौकशी केली असता ही घरफोडी त्यानेच केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली असून सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो मावळ यांच्या समक्ष हजर करून त्याची पोलीस कोठडी मागितली असता त्याची दि. 3/8/2020 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असून त्याच्या विरुद्ध बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्या बाबत गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी, चोरी केल्याचे तपासात समोर आले.
उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा उपविभाग नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो. ना. जितेंद्र दिक्षित ( 1918), पो. कॉ. हनुमंत शिंदे ( 1193), पो. कॉ. शरद जाधवर ( 2294), व पो. कॉ. गणेश होळकर ( 422 ) यानी अधिक कसून चौकशी केली असता लोणावळा शहर हद्दीतील “लोढा” ह्या उच्चंभ्रू सोसायटी मधील बंगला नं. 30 मध्ये त्याने चोरी केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. सदर आरोपीस आणखी विश्वासात घेऊन तपास केल्यास लोणावळा व बाजूच्या परिसरातील आणखी घरफोडी करून चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप घोरपडे यानी दिली आहे.