Saturday, April 20, 2024
Homeक्राईमबनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी दहा जणांवर लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये...

बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी दहा जणांवर लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

लोणावळा : बनावट कागदपत्राच्या आधारे कुणे नामा लोणावळा येथील सोशल वेल्फेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुणे नामा लोणावळा येथील गट नं. 98, ही 5 हेक्टर 80 गुंठे शेत जमीन सोशल वेल्फेअर सेंटरच्या नावावर असताना संबंधितांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून उद्योजक विनय चावला यांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून मागील सन 2013 ते 2019 या कालावधीत 7 कोटी 26 लाख रुपये लाटण्यात आले असल्याचे चावला यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलिसांनी किशोर ललवाणी व किशोर मंदियानी या दोघांना अटक केली आहे. तर तुलसी परमानंद जसनानी, गौतम तुलसी जसनानी ( रा. खार, मुंबई ) किशोर ललवाणी ( रा. बांद्रा, मुंबई )किशोर डी. मंदियानी ( रा. खार, मुंबई ) महेश नरेंद्र अलीमचंदानी, शारदा महेश अलीमचंदानी ( रा. लिंकरोड, खार, मुंबई ) राम पी. अवस्थी ( रा. फोर्ट, मुंबई ) मिशेल ब्रिगेन्झा, ब्रिगेड ब्रिगेन्झा ( रा. बांद्रा, मुंबई ) व विनोद मिस्त्री आणि कंपनी यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गु. र. नं. 435/2020, भा. द. वि. कलम 406, 420, 423, 467, 468, 471, 120 ( ब ), 34 अन्वये लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यासंदर्भात विनय ताराचंद चावला ( वय 41, रा. वरळी, मुंबई ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करून आरोपी किशोर ललवाणी व किशोर मंदियानी यांना मा. न्याय दंडाधिकारी सो वडगाव मावळ यांच्या समोर हजर केले असता वडगाव न्यायालयाने मंगळवार ( दि. 22 ) पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत करत आहे.

मावळ व लोणावळा परिसरातील बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्याबद्दल उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रतिक्रिया…….


मावळ व लोणावळा परिसरामध्ये जमिनीचे बनावट कागदपत्रे बनवून स्थानिक व बाहेरील उद्योजकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यासंदर्भात तात्काळ गुन्हे दाखल करून संबंधित आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासून यापूर्वी असे गुन्हे केले असल्यास त्या गुन्हेगारांवर ( मोका ) अंतर्गत कारवाई करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page