Thursday, March 28, 2024
Homeपुणेबनावट विमान तिकिटाच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक,,, चाकण पोलिसांत गुन्हा दाखल !

बनावट विमान तिकिटाच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक,,, चाकण पोलिसांत गुन्हा दाखल !

चाकण : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विविध विमान कंपन्यांच्या प्रवासाची बनावट तिकिटे बनवत नागरिकांना विकून 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दि. 28 नोव्हेंबर 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत पॉलीरब कंपनी महाळुंगे येथे घडला.

याप्रकरणी प्रियेश पीटर लोपिस ( वय 30 , रा . पालघर ) यांनी शुक्रवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . दिलेल्या फिर्यादेनुसार जैन अँड जोशी फर्म या कंपनीचे मालक योगेश राणावत यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची पॉलीरब ही कंपनी महाळुंगे येथे आहे . आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीतील लोकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी विमान तिकिटे देतो असे सांगितले . देशांतर्गत प्रवासासाठी इंडिगो एअरलाईन्स , विस्तारा एअरलाईन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी युरोप व युके येथे जाण्या – येण्यासाठी एमिरेटस एअरलाईन्स या कंपनीची तिकिटे देण्याच्या बहाण्याने आरोपीने बनावट व अवैध तिकिटे फिर्यादी यांना दिली.त्यातून फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीची 12 लाख 26 हजार 625 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page