Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबाळाराम दत्तात्रेय पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी व शिक्षक संघटनांची फिल्डिंग...

बाळाराम दत्तात्रेय पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी व शिक्षक संघटनांची फिल्डिंग !

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ” शिवालय ” येथे बैठक…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक – २०२३ महाविकास आघाडीतील पक्ष शेतकरी कामगार पक्ष – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस तसेच पुरोगामी शिक्षक संघटना , टी. डी. एफ. , बहुजन शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संसद , महाराष्ट्र राज्य क्रिडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ , महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील हे असून मंगळवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या निवडणुकीची योग्य फिल्डिंग लावून उमेदवारांच्या पारड्यात सर्वाधिक मते मिळण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कर्जत तालुक्यातील जेष्ठ पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील काळात आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षक वर्गाचे कल्याण व शिक्षणाची संपन्नता जपण्यासाठी वाड्या – पाड्यातील प्रश्न टोकाचा संघर्ष करून प्रत्येक स्तरावर जाऊन समस्येला न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न केले आहेत , जुनी पेन्शन मिळण्यासाठी नागपूर पायी दिंडी काढली , निधीचा सदुपयोग केला , विना अनुदानाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा , यासाठी भिडे वाडा ते मंत्रालय भर पावसात मोर्चा काढून सरकारला जाब विचारला , नवीन अंशदान पेन्शन धारक शिक्षकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना १० लाख रू.सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , असे विविध प्रश्न त्यांनी सोडविले असल्याने उमेदवार बाळाराम पाटील यांचे पारडे नक्कीच जड असून ते विजयी होतील , अशीच खात्री या बैठकीतून दिसून येत आहे.

सदरच्या या मोर्चे बांधणी बैठकीस बबन दादा पाटील- जिल्हा सल्लागार , नितीन सावंत – उपजिल्हाप्रमुख , उत्तम कोळंबे – कर्जत तालुका प्रमुख , सुदामदादा पवाळी – कर्जत ता.संपर्कप्रमुख , राम राणे – शेकाप नेते कर्जत , नारायण डामसे – शेकाप जि. प.सदस्य , दशरथ भगत – उपतालुका प्रमुख , राजाराम शेळके – माजी तालुका प्रमुख , पंढरीनाथ राऊत – माजी सभापती कर्जत पं. समिती , दिनेश देशमुख – उपतालुका प्रमुख , प्रमोद सुर्वे – उपतालुका प्रमुख , पांडु बागडे – उपतालुका संघटक , रामदास घरत – उपतालुका प्रमुख , दिनेश भोईर – उपतालुका प्रमुख , बबन म्हात्रे – कर्जत निरिक्षक शेकाप , गजानन पेमारे – सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती , राजेंद्र हजारे – आर.डी. सी.सी. बँक संचालक , विष्णू कालेकर – नेरळ वि. वि. सोसायटी संचालक , रविंद्र भोईर – सरचिटणीस शेकाप , श्रीकांत आगीवले – कर्जत शहर शेकाप चिटणीस , रामदास शेलार – उमरोली विभाग शेकाप , नितीन धुळे – उपतालुका प्रमुख , माधव कोळंबे – जेष्ठ शिवसैनिक , अविनाश भासे – सहसंपर्क प्रमुख कर्जत , निलेश घरत – कर्जत शहर प्रमुख , दिनेश भासे – विभागप्रमुख उमरोली ,आदी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
- Advertisment -

You cannot copy content of this page