Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबीडखुर्द गावातील महिलांचा पाण्यासाठी टाहो, महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंच समोर मांडल्या...

बीडखुर्द गावातील महिलांचा पाण्यासाठी टाहो, महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंच समोर मांडल्या व्यस्था…

खालापूर(दत्तात्रय शेडगे)लॉक डाऊनमुळे घरात झालेली घुसमट त्यात आता घरातील पाण्याची टंचाई अशा परिस्थितीने गावातील नागरिक हवालदिल झाले असून खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार?, अशी विचारणा महिलाकडून होत असताना बीडखुर्द गावातील महिला वर्गानी एकत्र होऊन ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या व्यथा सरपंच कविता भानुदास पाटील यांच्याकडे मांडल्या असून यावेळी सरपंच यांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक ठिकाणी केलेले पत्रव्यवहारांची माहीती महिलांना समजून सांगितल.

तर आजपासून टँकर द्वारे पाणी पुरवठा गावात सुरू होणार असल्याचे मत सरपंच पाटील यांनी व्यक्त केल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असलातरी आमच्या वाट्याला पाण्यासाठीची वणवण पाचवीलाच पुजल्याचे मत महिलांनी व्यक्त स्पष्ट केले.


खालापुर तालुक्यातील बीडखुर्द गावात कोरोना संकटाबरोबर एक नवीन संकट उभं राहिलंय. एप्रिलच्या शेवटला पाणी टंचाई भेडसावू लागलीय. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली असून एका बाजूला कोरोना संक्रमणाच संकट उभे आहे. तर दुसऱ्या बाजूला गावात भीषण पाणी टंचाईच संकट आ वासून उभं ठाकलंय असल्याने सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून पुढील महिना कसा काढायचे असा प्रश्न लोकांना पडल्याने महिला वर्गात नाराजी उमटू लागली.

असताना बीडखुर्द गावातील महिलांना 27 एप्रिल रोजी एकत्र जमून ग्रामपंचायत कार्यालय गाठून पाण्यासाठी होणारी वणवणींच्या व्यथा मांडल्याने काही काळात महिलांमध्ये आक्रोश मिळाला झाला असता सरपंच कविता पाटील यांनी पाणी पुरवठा आपल्या गावात सुरु करण्यासाठी शासन दरबारी ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा केल्याचे सांगून आजपासून गावात पंचायत समिती मार्फत टँकरने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगितल्यांने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

- Advertisment -

You cannot copy content of this page