Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबीडखुर्द येथे अवकाळी पावसाने झोपडी कोसळून लेकीचा जागीच मृत्यू तर आई बालबाल...

बीडखुर्द येथे अवकाळी पावसाने झोपडी कोसळून लेकीचा जागीच मृत्यू तर आई बालबाल वाचली…


खोपोली- दत्तात्रय शेडगे
सध्या संपूर्ण खालापूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून ढगाच्या कडकडासह मुसळदार पाऊन गेल्या तीन – चार दिवस कोळसत असल्याने यामुळे अनेकांचे जनजीव वाडीतील कुड व मौगरोली कवले असलेला कच्चा घर 15 अॉक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे दिड वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने या घटनेत 45 वर्षीय शकुतला गोविंद वाघमारे हीचा जागीच मृत्यू झाला तर 75 वर्षीय कीसी बाबाजी पवार या महिलेला गंभीर दूखापत झाली असून या घटनेत लेकीचा जागीच मृत्यू आणि आई बालबाल वाचली.
या घटनेची माहिती मिळताच आमदार महेंद्र थोरवे आणि तहसिलदार इरेश चप्पलवार, पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे यांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण घटनेचा आढावा घेत सर्वतोय मदत शासनाकडून मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार 15 अॉक्टोबरच्या मध्यरात्री बीडखुर्द आदिवासीवाडीतील 45 वर्षीय शकुतला वाघमारे व 75 वर्षीय कीसी पवार या मायलेकी गाढ झोपेत असताना त्याचा कुड व मौगरोली कवले असलेला कच्चा घर अवकाली पावसाने कोसल्याने या दुर्घटनेत लेक शकुतला वाघमारेचा जागीच मृत्यू झाला तर आई किसी पवार बालबाल वाचली आहे.
या घटनेने बीडखुर्द आदिवासी वाडीत हळहळ व्यक्त केली जात असून या कुटुंबाला लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात मदत शासनाच्या वतीने मिळावी अशी मागणी येथील बांधवानी केली आहे.
तसेच याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलिस निरिक्षक धनाजी क्षीरसागर, गटविकास आधिकारी संजय भोये, पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे, विस्तारक अधिकारी तांडेल, मंडळ अधिकारी विश्वास गडदे, प्रतिक बापरडेकर,आर.बी.कवडे, माधव कावरखे, अभिजीत हिवरकर, ग्रामसेवक निवृत्ती आंधळे, बीडखुर्द सरपंच कविता भानुदास पाटील, सदस्य अजित पाटील, भाऊ पवार, सावित्री पवार, आरोग्य अधिकारी डॉ.राठोड, अभिजित काळे, विनायक मुळे, पोलिस पाटील चंद्रकांत खोपडे, शिवसेना खालापुर तालुकाप्रमुख संतोष विचारे, उप संजय देशमुख, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, राजेश चोरगे, अनंता कर्णुक, तानाजी दिसले, दत्तात्रेय दिसले, राकेश कर्णुक आदीनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला.
प्रतिक्रिया –
बीडखुर्द वाडीत घडलेली ही घटना अंगाला शहारे आणणारी असून या दुर्घटनेत लेकीचा जागीचा मृत्यू झाला तर आईचे दैव बलवत्तर म्हणून बालबाल वाचली.
महेंद्र थोरवे – आमदार
प्रतिक्रिया –
या बीडखुर्द घटनेची आम्ही पाहणी बीडीओ संजय भोये यांच्या समवेत केली असून या नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर घरकुल योजनाचा लाभ देऊ तसेच दुखापतग्रस्त महिलेला उपचारासाठी सर्वोतय मदत करू.
अक्षय पिंगळे – पंचायत समिती सदस्य
प्रतिक्रिया-
बीडखुर्द वाडीत घडलेला घटनेचा तात्काळ पंचनामे केले असून त्या कुटुंबाला किराणा साहित्याची किट त्वरीत देण्यात आली असून उर्वरीत मदत लवकरात लवकर करण्यात येईल.
इरेश चप्पलवार – तहसिलदार

- Advertisment -

You cannot copy content of this page