Thursday, April 25, 2024
Homeपुणेमावळबुधवारी कार्ला येथे कोरोना सर्वेक्षन मोहीम कार्ला मावळ..

बुधवारी कार्ला येथे कोरोना सर्वेक्षन मोहीम कार्ला मावळ..

कार्ला मावळ (प्रतिनिधी- गणेश कुंभार .21 स्पटेंबर 2020) कार्ला गावात वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता दि . बुधवार 23 सप्टेंबर रोजी संपुर्ण कार्ला गावात मावळ उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार व कार्ला ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामसेवक सुभाष धोत्रे यांनी दिली .या सर्वेक्षण अभियानांतर्गत बुधवारी संपुर्ण कार्ला गाव बंद राहणार असुन एक दिवसाचा जणता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.
” माझं कुटुंब माझी जबाबदारी “या महाराष्ट्र शासनाच्या मोहीमे अंतर्गत तपासणी करण्यात येणार असुन या मोहिमेत डाॅक्टर ,शिक्षक, व गावातील काही तरूण स्वयंसेवक, आशा सेविका सहभागी होणार आहे . शासनाच्या या मोहीमे अंतर्गत ट्रेस,ट्रॅक,ट्रिट या त्रिसुत्रीचा वापर करून , टेंप्रेचर व पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
नागरिकांनीदेखील मनात कोणताही संकोच न बाळगता घरोघरी माहीती संकलनासाठी प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी येणार्या आरोग्य दुतांना अचुक माहीती द्यावी काही त्रास होत असेल तर त्या बाबतीत देखील सांगावे ,जेणेकरून तत्काळ उपचार होवुन रूग्ण बरा होवु शकतो . कोणीही भिती बाळगु नये , गावातील सर्व नागरिकांनी त्या दिवशी घरी राहुन आपल्या कुंटुबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुण घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
असे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे,माजी सभापती शरदराव हुलावळे, माजी पंचायत समिती सदस्य दिपकशेठ हुलावळे,माजी उपसरपंच प्रदीप हुलावळे,माजी उपसरपंच किरण हुलावळे,माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे , प्रशासक बाळासाहेब दरवडे, पोलीस पाटील संजय जाधव, सतीश मोरे, कार्ला आरोग्य आधिकारी डाॅ.भारती पोळ.डाॅ चंद्रकांत गवलवाड , शीघ्र व्यवस्थापन समिती यांनी केले आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन, कोरोना रोगाची साखळी जर तोडायची असेल तर नागरिकांनी सुध्दा तोंडाला मास्क लावने फिजिकल डीस्टंन्सिगच्या नियमांचे पालन केले पाहीजे.
- Advertisment -

You cannot copy content of this page