Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळाबुलेट राजांवर कारवाईसाठी लोणावळा पोलीस अलर्ट मोडवर,दोघांविरोधात गुन्हा दाखल…

बुलेट राजांवर कारवाईसाठी लोणावळा पोलीस अलर्ट मोडवर,दोघांविरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी):बुलेट दुचाकीचा कर्णकर्कष आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट राजांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई सुरु झाली असून याप्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजू कांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी सुजल अजय जाधव ( वय 19, रा. वलवण लोणावळा) व मयूर विलास भिंताडे( वय 25, रा. देवले, मावळ ) या दोघांविरोधात भा.द.वी.का. कलम 290,34 मोटारवाहन कायदा कलम 198,232/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बुलेट सायलेंसर बदलून कर्णकर्कष आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यानुसार दि. 18/02/2023 रोजी रात्री 8:30 वा. च्या सुमारास रायवुड येथे यातील आरोपींनी त्याचे ताब्यातील राॅयल इनफिल्ड कंपनीची बुलेट नं MH 14 KC 1136 ही रायवुड ते लाणावळा बाजुकडे जाणारे रोडवर धोकादायक भयसुचक व कर्णकर्कष आवाज येईल असा सायलेन्सर मध्ये बदल करून सर्वसामान्य जनतेस शारीरिक व मानसीक त्रास होईल असे कृत्य करताना मिळून आले. दोन्ही आरोपिं विरोधात भा.द.वी.कलम 290 मोटार वाहन कायदा कलम 198,232/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकील शेख पुढील तपास करत आहेत.
तसेच आपल्याकडील बुलेट च्या सायलेन्सर मध्ये कुठलाही बदल करू नये व सायलेन्सर मध्ये बदल केल्यास तर पोलीस कारवाईस तयार राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page