Thursday, March 28, 2024
Homeक्राईमबेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या इसमास देवले येथून ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात..

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या इसमास देवले येथून ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात..

लोणावळा दि.28: नवीन वर्षाच्या पार्श्व् भूमीवर अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठया शिताफिने घेतले ताब्यात.

लोणावळा शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी तसेच त्यामध्ये कोणी अपराधी शिरकाव करू नये यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्या इसमास देवले माळवली येथून सापळा रचून ताब्यात घेत प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार दि.27 रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे विशेष मोहीम राबवत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम बेकायदेशीर हत्यार बाळगून देवले गावच्या परिसरात फिरकत आहे.

सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने मळवली देवले या परिसरात सापळा रचला असता प्रशांत शांताराम आंबेकर ( रा. देवले, माळवली ) हा संशयीत रित्या फिरत असता यास ताब्यात घेऊन याची अंग झडती केली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. हे पिस्टल तुझ्याकडे आले कुठून अशी चौकशी केली असता त्याने अनिकेत अशोक कालेकर ( रा. पवना नगर, मावळ ) याने दिले असल्याचे सांगितले असता त्याचबरोबर पोलीस पथकाने अनिकेत कालेकर यालाही मोठया शिताफिने ताब्यात घेतले आहे.

बेकायदेशीर अग्नी शस्त्र बाळगणाऱ्या प्रशांत शांताराम आंबेकर व अनिकेत अशोक कालेकर या दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 185, भा.द.वी.कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना मा. वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 1/1/2022 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शस्त्र बाळगन्याबद्दलचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर हे करत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहाय्यक फौजदार शांताराम बोकड, पोलीस हवालदार अमित ठोसर, विजय गाले, शकील शेख, पोलीस नाईक गणेश होळकर, शरद जाधवर, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page