Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबोरघाटात टेम्पोचा ब्रेक झाल्याने पलटी, सुदैवाने बाईकस्वार जीवित हानी टळली, एका महिला...

बोरघाटात टेम्पोचा ब्रेक झाल्याने पलटी, सुदैवाने बाईकस्वार जीवित हानी टळली, एका महिला जखमी..

खोपोली- दत्तात्रय शेडगे.


पुण्याहून मुबंई कडे माल घेऊन जात असताना आयसर टेम्पोचा बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने दस्तूरी जवळ तीव्र उतारावर पलटी होऊन भीषण अपघात झाला सुदैवाने टेम्पो खाली दुचाकीस्वार येताना वाचला असून मोठी दुर्घटना टळली, मात्र दुचाकी वरील एक महिला जखमी झाली आहे.

तर खोपोली कडून लोणावळा कडे जाणाऱ्या वाहनांची या घाटातून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र आता सुदैवाने अनेक गाड्या वाचल्या असून मोठी दुर्घटना टळली,
पुण्याहून मुबंई कडे धागाचा माल घेऊन जात असताना आयसर टेम्पो हा जुन्या मुबंई पुणे महामार्गाने बोरघाटातून येत असताना तो दस्तूरी येथील तीव्र उतारावरील अवघड वळणावर आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो पलटी झाला.

सुदैवाने या टेम्पोखाली येताना दुचाकीस्वार येताना थोडक्यात जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.टोल वाचण्यासाठी ही वाहने लोणावळा येथून एक्सप्रेसवेने न जाता ती खंडाळा मार्गे बोरघाटातुन खोपोली कडे येतात त्यामुळे येथून येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी ग्रामस्थासह वाहन चालकांनी केली आहे.


या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, टीम अपघातग्रस्त टीम चे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत.

- Advertisment -

You cannot copy content of this page