Thursday, March 28, 2024
Homeपुणेमावळबोरज गावातील आरोग्य शिबिरात 80 नागरिकांवर उपचार व मार्गदर्शन...

बोरज गावातील आरोग्य शिबिरात 80 नागरिकांवर उपचार व मार्गदर्शन…

मळवली दि.31: मावळ तालुक्यातील बोरज गावातील लोकांसाठी मोफत सर्व रोग निदान आणि उपचार सल्ला व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या मार्फत पाटण बोरज ग्रामपंचायत च्या वतीने काही दिवसांपासून सुरु आहे. या आरोग्य शिबिरात दि.29 रोजी पाटण गावातील नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घेतला होता.

या हद्दीत सर्व रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे सत्र सातत्याने सुरु असता दि.30 रोजी बोरज गावात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पाटण प्रमाणे बोरज ग्रामस्थांनी देखील या शिबिराचा बहुसंख्येने लाभ घेतला.

यावेळी डॉ.पल्लवी बालगुडे आणि त्यांच्या टीमने रुग्णावर उपचार केले आणि मार्गदर्शन करून औषधे दिली.सदर शिबिराचे उद्घाटन बोरज गावचे सरपंच प्रविणशेट तिकोणे , उपसरपंच दत्तात्रय केदारी , ग्रामसेवक पठाण भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले, या आरोग्य शिबीरामध्ये सर्व रोगाचे निदान करण्यात आले . गावातील 80 नागरीकांनी याचा लाभ घेतला यामध्ये गावातील 5 ते 15 वयोगटातील सर्व लहान मुले तंदुरुस्त असून दातांच्या आजाराशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा आजार नाही. तसेच गावातील महिलांमध्ये गुडघे दुखी, अशक्त पणा , अंगदुखी , अंगाला खाज सुटणे , रक्ताचे प्रमाण कमी , बी पी , शुगर , असे आजार जास्त प्रमाणात दिसून आले, त्यावर उपचार करण्यात आले. गावातील वृद्ध लोकांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही , वयोमानानुसार आजाराचे प्रमाण आहे , तरुण पुरुषांमध्ये अंगदुखी चा त्रास असल्याचे डॉ. पल्लवी बालगुडे यांनी सांगितले या सर्वावर उपचार करण्यात आले आहेत.

सदरचे शिबीर गणेश केदारी, संदीप तिकोणे अतुल घोडके, लहू रसाळ, स्वप्नील तिकोणे, शुभांगी केदारी इत्यादींसह सर्व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या उपस्थितीत खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पाटण चे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक,सर्व सदस्य आणि सर्व आरोग्य कर्मचारी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था मावळ तालुका व्यवस्थापक बापू माने यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page