Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय बौद्ध महासभेचा उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर आणि कार्यकर्ता मेळावा कशेळे येथे...

भारतीय बौद्ध महासभेचा उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर आणि कार्यकर्ता मेळावा कशेळे येथे संपन्न !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा , सोसायटी नोंदणी क्र . ३२२७ , विश्वस्त नोंद .क्र . एफ – ९८२ मुंबई , संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर , ट्रस्टी रिपोर्टर व राष्ट्रीय महासचिव आद . व्ही .एस . मोखले तसेच शाखा तालुका कर्जत जि. रायगड , विभाग क्रमांक ५ / ६ च्या विद्यमाने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर आणि कार्यकर्ता मेळावा सारनाथ बुद्धविहार – कशेळे , तालुका कर्जत येथे उपरोक्त संस्थेच्या वतीने धम्म प्रशिक्षण करून घराघरात बौद्ध धम्म रुजविणेचे काम करणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शिबिराच्या माध्यमातून सांगून धम्म संस्था वाढविणे आवश्यक असल्याने गुरुवार दि. १६ डिसेंबर ते शनिवार दि.२५ डिसेंबर २०२१ या कालावधीत १० दिवसांचा उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते .

तसेच दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० – ०० ते दुपारी २ – ०० पर्यंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रायगड भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष व कर्जत तालुका अध्यक्ष आद .के .के. गाढे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील अनेक बौद्ध बांधव व उपासिका उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे ट्रस्टी महासचिव आद .व्ही.एस.मोखले , महेंद्र मोरे – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष , काशिनाथ कांबळे – रायगड जिल्हा अध्यक्ष , यांनी धम्म कार्यकर्त्यांचे कर्तव्य , जबाबदारी तसेच संस्थेच्या सध्याची स्थिती – वाटचाली बाबत अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव संजय जाधव , आद. डोंगरे – कोषाध्यक्ष ठाणे , आयुमा. मनोरमा डंगारे – उपाध्यक्षा ठाणे , जिल्हा सचिव – रमेश गायकवाड , के.के.निकाळजे , पी.एस.गायकवाड , जिल्हा पर्यटन सचिव – बी .एस .गायकवाड , हे हजर होते.तर कर्जत तालुका अध्यक्ष के.के.गाढे , तालुका सचिव रविंद्र जाधव , ए.डी.जाधव – कोषाध्यक्ष , मारुती गायकवाड – संस्कार उपाध्यक्ष , सूर्यकांत गायकवाड – उपाध्यक्ष , मधुकर शिंदे , उद्योजक सुरेश सोनावळे , जनार्धन खंडागळे – माजी सरपंच – कशेळे , दिपचंद गायकवाड , ह.ना.जाधव , दिपक जाधव , राजेश ढोले , भगवान पंडीत , शांताराम जाधव , मनीषा फाळे , सविता गायकवाड ,

बबन भालेराव , किसन रोकडे , रविंद्र गायकवाड , अशोक शिंदे , बाळू देसाई – विभाग क्र. ७ अध्यक्ष, श्याम रोकडे – विभाग क्र. ८ अध्यक्ष , संतोष रोकडे ,अरुण गायकवाड , भिमा गायकवाड , बौद्धाचार्य संजय ढोले ,भीमराव रोकडे , त्याचप्रमाणे अनेक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर व कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी आद .के.के.निकाळजे , ए .डी. जाधव , राहुल तरुण मंडळ व यशोधरा महिला मंडळ – कशेळे , कशेळे विभाग क्र. ४ / ५ चे अध्यक्ष बबन भालेराव , सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनावळे , जनार्धन खंडागळे – माजी सरपंच कशेळे , व कशेळे ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले.सायंकाळी ५ – ३० वाजता उपासिका धम्म शिबिराचे सांगता समारोप पार पडला.

- Advertisment -

You cannot copy content of this page