Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळामनशक्ती केंद्राच्या वतीने लो. न. प माध्यमिक विद्यालय लोणावळा च्या विध्यार्थ्यांना वह्या...

मनशक्ती केंद्राच्या वतीने लो. न. प माध्यमिक विद्यालय लोणावळा च्या विध्यार्थ्यांना वह्या वाटप !

लोणावळा : लोनप माध्यमिक विद्यालयात मनशक्ती केंद्राच्यावतीने मोफत वह्यावाटप करण्यात आल्या.

सेवा परमो धर्म या भावनेतून लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, लोणावळा विद्यालयाच्या विध्यार्थ्यांना मनशक्ती केंद्र लोणावळाच्या माध्यमातून मोफत वह्यावाटप करण्यात आल्या.मनशक्ती केंद्राच्या वतीने दरवर्षी विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते व अभ्यास कसा करावा याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येते. याही वर्षी विद्यालयाचा एस एस सी बोर्डाचा निकाल 100% लागल्याने केंद्राच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी मनशक्ती केंद्राचे श्री. फापाळे सर यांनी विध्यार्थ्यांना वाचन व लेखनाचे महत्व सांगितले तर पालकांनी विध्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिकवले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक बलकवडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पारीठे सर यांनी आभार मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page