Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनसेने दिली खालापूर महावितरण कार्यालयावर धडक वाढीव विजबिलाबाबत विचारला जाब.

मनसेने दिली खालापूर महावितरण कार्यालयावर धडक वाढीव विजबिलाबाबत विचारला जाब.

दत्तात्रय शेडगे- खालापूर

खालापुरात वाढिव वीज बिल आणि वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे वैतागलेल्या खालापूरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असून गुरूवारी खालापूर महावितरण कार्यालयात मनसे कार्यकर्त्यानी धडक दिली.

कोरोना आणि निसर्ग चक्रिवादळाचे कारण पुढे करत महावितरणाकङून रिडींग न घेता देण्यात आलेली भरमसाठ वीज बिलाचा शाॅक बसलेला असतानाच वारंवार वीज पुरवठा खंडीतमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र सर्वत्र मनसे आंदोलन करत असल्याने खालापूरात मनसेने देखील आग्रही भूमिका घेतली असून मनसे कार्यकर्ते गुरूवारी खालापूर महावितरण कार्यालयावर धडकले.

महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि गायकवाङ यांच्या समोर नागरिकांच्या समस्येचा पाढाच  वाचून दाखविला.वाढिव वीज बिलात दुरूस्तीसाठी खालापूर येथे सकाळी दहा ते बारा यावेळेत कर्मचारी नेमण्यात येणार असल्याचे गायकवायांनी आश्वासन दिले.तसेच वारंवार खंडीत वीज पुरवठा होवू नये यासाठी ट्रिपर बसविण्याचे काम सुरू असून या महिन्या अखेर सर्व कामे पूर्ण होतील अशी माहिती महावितरण अधिकारी गायकवाडयांनी मनसे कार्यकर्त्याना दिली.यावेळी मनसे खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक,खालापूर शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी,  महिला तालुका अध्यक्ष  हेमलता चिंबुळकर आदींसह अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page