Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमहापालिका निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता...

महापालिका निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता…

महाराष्ट्र – राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आज सोमवारची सुनावणीही लांबणीवर गेली आहे . आता 4 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे .

त्यामुळे महापालिका निवडणुका आता पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले . त्यानंतर राज्यातल्या विविध महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत . या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे . राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात 13 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत .

या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील 7 , 21 एप्रिलची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती . आज 25 एप्रिल रोजी होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते . पण , न्यायालयातील आजची सुनावणी देखील पुढे ढकलली आहे . सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 4 मे ची तारीख दिली असून आता 4 मे च्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page