Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष बांधणी आढावा बैठक लोणावळा येथे संपन्न !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष बांधणी आढावा बैठक लोणावळा येथे संपन्न !

लोणावळा : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका कोर कमिटीच्या उपस्थितीत लोणावळा शहर कार्यकारणी निवडी बाबतची आढावा बैठक आज भांगरवाडी येथील सुमित्रा हॉलमध्ये संपन्न झाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नुकतीच काही महिन्यांपूर्वी तालुका अध्यक्ष पद वगळता संपूर्ण मावळ तालुक्याची पक्ष कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.
या अनुषंगाने पुन्हा एकदा तालुक्यात पक्ष बांधणी तसेच पक्षाला उभारी देण्यासाठी नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व निवडी केल्या जाणार असून यांचीच सुरवात आज लोणावळा शहरा मधून मनसे मावळ कडून आढावा बैठकीद्वारे करण्यात आली.

यावेळी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर,मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर,कोर कमिटी सदस्य तानाजी तोडकर,सुरेश जाधव,संजय शिंदे,पांडुरंग असवले,भारत चिकणे,मंगेश खराडे,सुशील पायघुडे तसेच मनसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page