Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदला खोपोलीत उत्फुर्त प्रतिसाद..

महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदला खोपोलीत उत्फुर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे शांततेच्या मार्गाने शेतकरी केंद्र सरकार विरोधात निदर्शन करत असताना भाजपच्या काही लोकांकडून शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या. त्यात 8 निष्पाप लोक मारले गेल्याने सदर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक 11 अॉक्टोबर रोजी दिल्याने बहुतांशी मोठ्या प्रमाणात या बंदला प्रतिसाद मिळाला असता खोपोली शहरात महाविकास आघाडीतील शिवसेना – राष्ट्रवादी – कॉग्रेस – शेकाप बंदला पाठिंबा देत खोपोली शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ निदर्शने दाखवत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करीत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

असून या संदर्भात खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिरिष पवार यांना निवेदन देण्यात आले.लखीमपुर खीरी येथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून क्रूर हत्या करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध आणि त्या हत्याकांडात सहभागी झालेल्या नराधमाना शासन व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि मित्रपक्षानी महाराष्ट्र बंद ठेवत शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला असता खोपोली शहरात ठराविक वेळ बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी एकवटत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील, राष्ट्रवादी शहरप्रमुख मनेश यादव, काँग्रेस शहरप्रमुख रिचर्ड जॉन, शेकाप शहरप्रमुख अविनाश तावडे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, विदयमान नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता औटी, नगरसेवक मनेश यादव, अमोल जाधव, नितीन मोरे, कुलदीप शेंडे, नगरसेविका प्रमिला सुर्वे, वैशाली जाधव, कॉग्रेस युवक अध्यक्ष अँड.संदेश धावारे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला अध्यक्षा सुर्वणा मोरे, शेकापचे किशोर पाटील, संंदीप पाटील, गुरुनाथ साठिलकर, शिवसेनेचे दिलीप पुरी, अनिल सानप, तात्या रिठे, राष्ट्रवादीचे रमेश जाधव, निखिल पालांडे आदीसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते – कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page