Thursday, March 28, 2024
Homeपुणेतळेगावमहाविद्यालयीन तरुणीला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या तरुणावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

महाविद्यालयीन तरुणीला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या तरुणावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

तळेगाव दाभाडे : लग्नास नकार दिला तरीही तरुणाकडून मुलीचा पाठलाग करत इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले , तसेच बहिणीच्या फोन वरती शिवीगाळ करून धमकी दिली . या सर्व त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थीनीने शेतावर फवारणी करण्याचे औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना 23 मार्च 2022 रोजी दारुंब्रे मावळ येथे उघडकीस आला आहे.

याबाबत सदर पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ओमकार गणेश देशमुख ( रा . गोडुम्ब्रे , मावळ ) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 ( ड ) , 504, 506 , 4 99 पोक्सो कलम 12अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी ओमकार याने फिर्यादी मुलीला लग्नाची मागणी घातली . मुलीने लग्नास नकार दिला . त्यानंतर त्याने फिर्यादी मुलीचा महाविद्यालयाच्या मार्गावर पाठलाग केला . बहिणीच्या फोनवर फोन करून शिवीगाळ केली व धमकी दिली.

तसेच , फिर्यादी यांच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरती दोघांच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले . या सर्व त्रासाला कंटाळून तरुणीने बुधवारी ( दि.23 ) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी शेतावर फवारणी करण्याचे औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला . संबंधित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून , सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page