Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाता रमाई यांची जयंती कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरी !

माता रमाई यांची जयंती कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरी !

भारतीय बौद्ध महासभा , जेष्ठ नागरिक व संविधान गौरव समितीचा पुढाकार…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ” माता रमाई भीमराव आंबेडकर ” यांची जयंती भारतीय बौद्ध महासभा , जेष्ठ नागरिक व संविधान गौरव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक ठिकाणी प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.
तर यावेळी माता रमाईंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक कर्जत शहारातून काढण्यात आली , यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली , यावेळी पुष्पहार आयुनी गीता गणपत गायकवाड व शालिनी सूर्यकांत सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , तर दत्त मंदिराच्या नंतर जकात नाका येथून मध्य बाजारपेठेतून नंतर जुनी नगर परिषद कार्यालय येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणूक आल्यावर भव्य सभेत रूपांतर झाले. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा आयुनी रजनीताई गायकवाड या होत्या , तर कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका आयुनी वैशाली मोरे यांनी केले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास उज्ज्वला साळवी व सविता जगताप यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस हर्षाली उमेश गायकवाड व शारदा दिपक भालेराव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अलका सोनवणे , व शोभा मोरे यांच्या हस्ते तर भारतीय संविधान प्रस्ताविकेस रत्ना गायकवाड व जया यादव यांच्या हस्ते , राजमाता रमाई यांच्या प्रतिमेस पूजा जाधव , सुषमा वायदंडे यांच्या हस्ते दिप व धूप प्रज्वलन करण्यात आले , सामुदायिक सुत्रपठन व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन हर्षाली जाधव , व कार्यक्रमाची प्रस्तावना वनिता यादव यांनी केले.

रात्री ठिक ७ वाजता ” बहुजन राजमाता रमाई भीमराव आंबेडकर ” यांचा जीवन संघर्ष यांच्यावर प्रवचनकार संपदा चव्हाण – माजी जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा , ( उत्तर ) केंद्रीय शिक्षिका , यांनी त्यांचा त्याग – संघर्ष – प्रेम यांचा जीवनपट सांगितले , तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बोखारे , तर आभार प्रदर्शन माही योगेश गायकवाड व स्नेहा आशिष गायकवाड यांनी केले . सदरच्या कार्यक्रमाचे आयोजक माता रमाई महिला मंडळ – पंचशील नगर , माता सावित्रीमाई फुले महिला मंडळ – कर्जत बौद्ध नगर , माता रमाई महिला मंडळ – दहिवली , माता रमाई महिला मंडळ – आकुरले , माता रमाई महिला मंडळ – गुंडगे , माता यशोधरा महिला मंडळ , यांनी केले होते . सदरच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापक भारतीय बौद्ध महासभा , जेष्ठ नागरिक , व संविधान गौरव समिती हि होती .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक , महिला व तरुण वर्ग उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page