Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान आजपासून पर्यटकांसाठी चालू, घोडेवाल्यात उत्साह..

माथेरान आजपासून पर्यटकांसाठी चालू, घोडेवाल्यात उत्साह..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
देशात कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातल्याने सगळी कडे कडक लॉक डाऊन सरकारने जाहीर केले होते, यामुले सर्वच काम धंद्यासह माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद होता ,गेल्या पाच महिन्यापासून माथेरान चा पर्यटक व्यवसाय बंद असल्यामुळे येथील घोडेवाले ,हॉटेल, बंद होते त्यामुळे येथील घोडेवाल्यासह गोर गरीब जनतेचे हाल झाले होते.


सरकारने लॉक डाऊन चार चे नियम शिथिल केल्याने आज पासून माथेरान पर्यटकांसाठी चालू केले असून यामुळे घोडे वाल्याचा व्यवसाय चालू झाल्यानें त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


गोर गरीब व ज्यांचे हातावरचे पोट असलेल्या गरीब घोडे मालक यांचे अतोनात हाल होऊन उपास मारीची वेळ आली होती, मात्र आज पासून पर्यटकांसाठी माथेरान खुले केले असून आज पहिल्यादा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आखाडे यांच्या घोड्यावर पहिला पर्यटक गेल्यानं सर्व घोडे मालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.

प्रतिक्रिया-
गेल्या पाच महिन्यापासून माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद असल्याने येथील हॉटेल्स सह घोडा व्यवसाय बंद होते यामुळे गोर गरीब घोडे वाल्याचे अतोनात हाल झाले होते ,मात्र आजपासून माथेरान पर्यकासाठी चालू केल्याने आमचा घोड्याचा व्यवसाय हळू हळू पूर्ववत होत आहे, आम्ही सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे करून सोशिअल डिस्टनशिंगचे पालन करत मास्क आणि सेनीटायझरचे वापर करत आम्ही व्यवसाय चालू केला आहे ,यामुळे आम्ही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे आभारी आहोत.

तुकाराम आखाडे घोडे मालक – माथेरान

- Advertisment -

You cannot copy content of this page