Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान बाबतीत जिल्हाधिका-यांचा सकारात्मक दृष्टीकोन..

माथेरान बाबतीत जिल्हाधिका-यांचा सकारात्मक दृष्टीकोन..

माथेरान (दत्ता शिंदे )
माथेरान हे असे एक रमणीय स्थळ आहे की ज्याच्या प्रेमात आपसूकच पडतात मग ते नवनवीन पर्यटक असोत अथवा वरिष्ठ अधिकारी वर्ग असो इथल्या समस्या अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी ते तत्परता दाखवतात. आज दि.२७ रोजी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांची नियोजित भेट असल्याने प्रेरणा सावंत यांनी अनेक विषय जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.

यामध्ये प्रामुख्याने इथे भेडसावत असणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे प्रारंभी सांगितले वाहतूकीची बाब ही खूपच खर्चिक असून यामुळेच स्थानिकांसह पर्यटकांचे अक्षरशः कंबरडे मोडते. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत.यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. त्याचप्रमाणे वनसंपदा दरवर्षी लोप पावत चालली आहे.

इतर महत्वाच्या समस्या बाबतीत डीएफओ आणि अधीक्षक रायगड यांची संयुक्त बैठक ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असून लवकरच मी स्वतः माथेरानला भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.यावेळी नगरपरिषदेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या प्रवासी कराचा महत्वपूर्ण विषय सुध्दा घेण्यात आला.शैक्षणिक सुविधा आणि इथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटानीकल गार्डनची निर्मिती झाल्यास पर्यटकांना याचा आनंद घेता येईल असेही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे स्पष्ट केले. यावेळी माथेरानच्या नवोदित मुख्याधिकारी सुरेखा भणगे( शिंदे ) उपस्थित होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page