Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान मध्ये गौरी गणपतीचे शासनाच्या नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात विसर्जन..

माथेरान मध्ये गौरी गणपतीचे शासनाच्या नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात विसर्जन..

शासनाचे नियम असल्याने महिला बच्चेकंपनी सह महिलांची अनुउपस्थितीची जाणीव….

माथेरान दता शिंदे
दरवर्षी माथेरान मध्ये प्रत्येक विभागवार माथेरान च्या मध्य भागी एकत्र येऊन एकोप्याचे दर्शन घडवत गणरायाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करत असत.परंतु ह्या वर्षी कोरोनाचे प्रादुर्भाव असल्याने गणरायाचे सोशलडिस्टन चे भान ठेऊन बाप्पाचे निरोप देण्यात आले.


पारंपरिक पद्धतीने दर वर्षी ढोल ताश्याच्या गजरात तर कोण अभांगाच्या नादावर तर कोण डी.जे.च्या तालावर बाप्पाची माथेरान शहरातून मिरवणूक निघायची शहराच्या मध्यवर्ती ठिकणी माथेरानच्या प्रत्येक गणपतीवर पुष्पवृष्टी होयाची त्या नंतर संपूर्ण माथेरानकर एकत्र मोठ्या उत्साहात गणरायला मोठ्या भक्ती भावाने निरोप देयाची व गणरायाला साकडे घालायचे गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या.असा जय घोषणाने आकाश दुमदुमयाचा.परंतु अगदी साध्या पद्धतीने ह्या वर्षी बाप्पाची ढोल ताशा व अभंगा विना मिरवणूक काढण्यात आली.

माथेरान च्या प्रत्येक विभागातील बाप्पाची आपापल्या घरातील ठराविक मंडळीनी गणपती विसर्जन स्थळी नेत होते.स्थानिक प्रशासनाचे नियम व अटींचे पालन करत तसेच सोशलडिस्टन चे पालन करत ह्या वर्षी अगदी कधी नव्हे ते ह्या वर्षी बाप्पाला लवकरच निरोप देण्यात आला.

- Advertisment -

You cannot copy content of this page